Chikhali News : कुदळवाडी येथील क्षयरोग सर्वेक्षण मोहिमेला प्रतिसाद

एमपीसीन्यूज : चिखली, कुदळवाडी येथे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या पुढाकाराने आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला आणि “माझे आरोग्य माझी जबाबदारी” याचा साक्षात अनुभव यादरम्यान आला.

क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात क्षयरोग रुग्ण शोधणे आणि त्याचे निराकरण करणे यावर अधिक भर देण्यात आला होता.

पालिका क्षयरोग निर्मूलन अधिकारी होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आकुर्डी आणि यमुनानगर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन नागरिकांच्या तपासण्या आणि उपाययोजना याबाबत नागरिकांचे समुपदेशन केले.

यावेळी सर्वेक्षण आणि पुढील काळात करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करून रूपरेषा ठरविण्यात आली.परिसरातील अनेक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला आणि तपासण्या करून घेत या उपक्रमाला यशस्वी केल्याची माहिती दिनेश यादव यांनी दिली आहे.

या जनजागृती मोहिमेतून नागरिकांच्या आरोग्य समस्यांबाबत मनपा आणि स्थानिक स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचे नागरिकांनी अभिनंदन केले. कुदळवाडी भागात आरोग्य यंत्रणांचे जाळे म्हणावे तसे पसरलेले नाही आणि अशा मोहिमांमध्ये नागरिकांचा सहभाग हा या भागातील सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून यावेळी देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिका क्षयरोग रोग नियंत्रण अधिकारी डॉ. होडगर, डॉ. ढोणे, यमुनानगर टीयुचे डॉ. भोईर, आकुर्डी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे, शेखर सरोदे (एसटीएस), प्रल्हाद जाधव (टीबीएचव्ही) यांच्या मार्गदर्शनाखाली कुदळवाडी परिसरामध्ये क्षयरोग जनजागृती व प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम आणि सर्वेक्षण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.