Chikhali News : संतपीठाला उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारी शाळा पुरस्कार

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात (Chikhali News) कार्यरत असणारी इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्ट फ्रेटरनिटी ग्रुपची चौथी इंटरनॅशनल परिषद उत्तर प्रदेशमधील आयोध्या येथे पार पडली. या परिषदेत पिंपरी- चिंचवड महापालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या शाळेला उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारी शाळा पुरस्कार देण्यात आला.

सीबीएसइ सचिव अनुराग त्रिपाठी एसपी पंकज पांडे IUEF चे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्या हस्ते संस्थेचे संचालक तथा शिक्षण विभाग उपायुक्त संदीप खोत, संचालक स्वाती मुळे, संचालक राजू महाराज ढोरे, प्राचार्य मृदुला महाजन यांनी पुरस्कार स्वीकारला.

Pune Crime : ‘अप्परची पोर गुन्हेगार…’, भाईगिरीचं गाणं बनवणाऱ्या तरुणाला बेड्या

संतपीठ शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध (Chikhali News) सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक उपक्रम राबवले जातात. 2021-22 मध्ये केलेल्या उपक्रमाची दखल घेऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज निवड केल्याची माहिती प्राचार्य मृदुला महाजन यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.