Chikhali : भंगारच्या गोदामाला आग; 8 गोदामे जळून खाक

एमपीसी न्यूज – भंगारच्या गोदामाला आग लागली. त्यात भंगारची आठ गोदामे जळून खाक झाली. सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल (गुरुवारी) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिखली-आळंदी रोडवर घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिखली-आळंदी रस्त्यावर भारत स्क्रॅप सेंटर नावाचे भंगारचे गोदाम आहे. या गोदामाला रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागाचे दोन आणि चिखली, तळवडे, प्राधिकरण अग्निशमन विभागाचे प्रत्येकी एक तसेच टाटा मोटर्सचा एक असे एकूण सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. या सहा बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान आग वाढल्याने त्यात आजूबाजूची आणखी सात भंगारची गोदामे जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.