Pune Fire : खराडी जकातनाक्याजवळ फर्निचर मॉल आणि मोबाईल शॉप दुकानाला भीषण आग

एमपीसी न्यूज : पुणे नगर महामार्गावर चंद्रनगरजवळील खराडी जकातनाक्याजवळ फर्निचर मॉल आणि मोबाईल शॉप दुकानाला आग लागली आहे. यामुळे परिसरातील वाहतुक ठप्प झाली आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अजुनही अस्पष्टच आहे.

आज सकाळाच्या सुमारास फर्निचर मॉलला आग लागली आणि काही वेळातच आगीसह धुराचे लोट वाढुन आजू बाजुच्या आठ दुकानांना आगीची झळ बसलीही आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या चार गाड्या कार्यरत राहिल्या.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. या घटनेची माहिती कळताच परिसरात नागरिकांची गर्दी वाढली. या आगीमुळे पुणे नगर महामार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.