Chikhali : ते गेले गोवा फिरायला मागे चोरट्यांनी केले घर साफ

एमपीसी न्यूज – गोवा फिरायला गेलेल्या (Chikhali) नागरिकाच्या घरी चोरट्यांनी दागदागिने, रोख रक्कम एवढेच नाही तर कागदपत्रे अशी एकूण 3 लाख 90 हजारांची चोरी केली आहे. ही चोरी जाधववाडी चिखली येथे 12 ते 16 जानेवारी या चार दिवसांच्या कालावधीत झाली आहे.

याप्रकरणी रविंद्र सोपान भुजबळ (वय 34 रा.जाधववाडी, चिखली) यांनी पिर्याद दिली असून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Bopkhel : भाडे मागितले म्हणून घर मालकिणीला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गोवा फिरण्यासाठी गेले होते. याच दरम्यान चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या तळमजला आणि पहिल्या मजल्याचे दाराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील 103 ग्रॅम वजनाचे 2 लाख 4 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 81 हजार रुपयांचे चांदिचे दागिने, 80 हजार रुपये रोख तसेच इतर घरगुती सामान, कागदपत्रे असा एकूण 3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.