Children’s Day : मुलांनी बाल दिनानिमित्त लुटला मेट्रो सफरचा आंनद

एमपीसी न्यूज : संत तुकाराम नगर (Children’s Day) येथे मेट्रो ब्रँड अँबेसिडर अभय भोर यांच्यासमवेत मुलांनी मेट्रो सफरचा आनंद लुटला. आज बाल दिनानिमित्त सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना आणि मुलींना संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे चित्रकला व नृत्य स्पर्धा तसेच मुलांना मेट्रोमध्ये सफर हा उपक्रम घेण्यात आला.

PCMC News : सार्वजनिक मुतारी, शौचालयांची संख्या वाढवा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी  


यावेळी मुलांना स्टेशनवर (Children’s Day) खाऊ वाटप, केक कापणे, चॉकलेट वाटप तसेच विविध खेळ घेण्यात आले. याप्रसंगी मुलांना मेट्रोमध्ये बसून खूप आनंद झाल्याचे मुलांनी सांगितले. तसेच, काही मुलांनी मेट्रोचे चित्र काढले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या पहल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष नीतू सिंग, दुर्गा ब्रिगेड संघटना अध्यक्ष दुर्गा भोर, अंजली जंगम अध्यक्ष एक उमंग फाउंडेशन यांनी विशेष नियोजन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.