Chinchwad : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे अपहरण आणि बलात्कार; संशयित आरोपी अटकेत 

एमपीसी न्यूज – तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरूणाने तिचे अपहरण केले. तसेच तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार चिंचवड आणि श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या गावात घडला.

दीपक रवींद्र तारे (वय 24, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. मागील तीन वर्षांपासून त्याच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच 14 सप्टेंबर रोजी पीडित तरुणीला तालुक्यातील काष्टी येथे नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तलवारीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.