Chinchwad Bye-Election : 14 जणांनी भरले 22 अर्ज तर डॉ. अनिल रॉय यांच्यासह 12 जणांनी घेतले अर्ज

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज अखेरपर्यंत 14 जणांनी 22 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. (Chinchwad Bye-Election) तर, महापालिकेचे निवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यासह 12 जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत.

31 जानेवारी पासून आजपर्यंत 123 जणांनी 220 उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, 14 जणांनी 22 अर्ज दाखल केले आहेत. भाजप उमेदवार अश्विनी जगताप, भाजपचे पर्यायी उमेदवार म्हणून शंकर जगताप, अपक्ष मोहन म्हस्के, रवींद्र पारधे, बालाजी जगताप, गोपाळ तंतरपाळे, अमोल सुर्यवंशी, सिद्धीक शेख, किशोर काशीकर, मिलिंदराजे भोसले यांनी देखील  उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Bhosari News : लोहार समाजाचा स्नेहमेळावा भोसरीत उत्साहात

महापालिकेचे निवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, निवृत्त सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे, तेजस माझिरे, गिरीश शेडगे, हरी महाले, चंद्रकांत खोचरे, मनोहर पाटील, विद्या पाटील, उत्तम सकटे, दीपक श्रीवास्तव, पृथ्वीराज थोरात, चंद्रकांत मोटे अशा 12 जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.