Chinchwad Bye-Election : चिंचवडमध्ये 50.47 टक्के मतदान,  गुरुवारी मतमोजणी  

एमपीसी न्यूज – चुरशीच्या झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. (Chinchwad Bye-Election) दुपारनंतर मतदानाच्या आकडेवारीत वाढ झाली. सन 2019 च्या निवडणुकीत 53.59 टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत पोटनिवडणुकीत 3 टक्के मतदान कमी झाले असून हा मतांचा टक्का कोणाला धक्का देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे तर अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात 3.52 टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी 9 ते 11 या दरम्यान 10.45 टक्के मतदान झाले.

Pune News : महिला उद्योजकांनी नाविन्यतेसोबतच ‘मार्केटिंग’कडेही लक्ष द्यावे – सुप्रिया सुळे

दुपारी 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर 3 वाजेपर्यंत 30.35 टक्के मतदान झाले. तर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 41.06 टक्के मतदानाची नोंद झाली. शेवटच्या अर्ध्या तासात 10 टक्के मतदान झाले. दिवसभरात 50.47 टक्के मतदान झाले.

5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 1 लाख 57 हजार 820  पुरुष तर 1 लाख 29 हजार 321 महिला, इतर 4  अशा 2 लाख 87 हजार 145 लोकांनी मतदान केले. 50.47 टक्के मतदान झाले आहे.दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात आली होती. नव मतदारांमध्ये उत्साह होता. (Chinchwad Bye-Election)  विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच नवमतदारांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. मतदान (ईव्हीएम) यंत्रे थेरगाव येथील स्व.शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे ठेवण्यात आली आहेत. दोन मार्च रोजी तेथेच मतमोजणी होणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.