Chinchwad Fraud: बिल्डिंग मालकाने केली 28.49 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज:  बिल्डिंग मालकाने कंत्राटदार व ग्राहकांची तब्बल 28.49 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.(Chinchwad Fraud) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

 

 

फायर फायटिंग व्यावसायिक दत्तात्रय सूर्यवंशी, वय 52 वर्षे, रा. आकुर्डी यांनी निगडी पोलीस ठाण्यात काल 20 जुलैला दिली आहे.(Chinchwad Fraud) याप्रकरणी धनराज सोनिगरा, वय अंदाजे 70 वर्षे व जितेंद्र सोनिगरा, वय 44 वर्षे, दोघे रा. फ्लॅट नं 302, मॅरीगोल्ड इमारत, मार्केट यार्ड, पुणे व संदेश गँगवाल, वय 50 वर्षे, रा. 243, सेक्टर 4, मोशी प्राधिकरण, पुणे या आरोपींच्या विरोधात भा. द. वि. कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Lonavla News: बालकाच्या मृत्यु नंतर प्रशासनाला आली जाग

 

हय्यू इंडस्ट्रियल स्पेसचे मालक धनराज सोनिगरा व जितेंद्र सोनिगरा व त्यांचे प्रोजेक्ट हेड संदेश गँगवाल यांनी 4 सप्टेंबर 2018 ला सकाळी 10 वा पासून ते 20 जुलै 2022 पर्यंत वरील तीन आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून चिंचवड एमआयडीसी मधील प्लॉट नं 19, कायनेटीक कंपनी जवळ असलेल्या  त्यांच्या हय्यू इंडस्ट्रियल स्पेस बिल्डिंगचे फायर फायटिंग सिस्टिमचे काम करून घेतले आणि त्याचे एकूण बिल 70,49,130 रुपये झाले होते. त्यांनी त्यापैकी थोडे थोडे करून आता पर्यंत 43 लाख रुपये दिले आहेत. फिर्यादीचे कामाचे 27,49,130 रूपये व सदर बिल्डिंग मध्ये एक गाळा विकत घेण्यासाठी दिलेले 1 लाख रुपये असे एकूण 28,49,130 रुपये बाकी असलेले आजतगायत फिर्यादी यांना दिलेले नाहीत. अशा प्रकारे आरोपींनी संगनमताने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.