Chinchwad Crime News : बनावट दस्त बनवून सव्वा कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीची मदत करण्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये हात उसने दिले. मात्र, पैसे बुडवण्याच्या उद्देशाने बनावट दस्त बनवून पैसे परत न देता फसवणूक केली. याप्रकरणी पाच जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

31 मार्च ते 10 मे 2021 दरम्यान विजयनगर, चिंचवड याठिकाणी हा प्रकार घडला.

सुरेश आत्माराम करपे, माधव सूर्यकांत उगिले, कांचन कुमार लक्ष्मण शेवाळे-पाटील, निलेश अच्युत जोशी, तुषार प्रभाकर वाघ अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय अशोक लोढा (वय 29, रा. जालना रोड, बीड) यांनी मंगळवारी (दि.25) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय अशोक लोढा यांचे वडील अशोक लोढा यांनी श्री इंजिनिअरिंग प्रा. लि या कंपनीस 1 कोटी 20 लाख रुपये हात उसने दिले. आरोपींनी पैसे बुडवण्याच्या उद्देशाने सही करुन दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट दस्त बनवून 1 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.