Maval Corona Update : तालुक्यात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या 100 पेक्षा कमी

एमपीसी न्यूज – मावळ  तालुक्यात बुधवारी (दि.26) 76 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात  दिवसभरात 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत  वाढ झाली आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,  आतापर्यंत 432 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2207 आहे.

शहरी भागात 20 तर ग्रामीण भागात 56  रुग्ण आज सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 16 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 4 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही  रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 21617 झाली आहे. तर दिवसभरात 50 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात नवलाख उंब्रे 8, कुसगाव बुद्रुक 5, खांड 5, साते 4, इंदोरी 4, भाजगाव 3, कुरवंडे 3, वराळे 3, कामशेत 2, सोमाटणे 2, गहूंजे 2, वाडीवळे 2 काले 2, सुदवडी, देवले, अजीवली, धामणे, माळवाडी, बुधवडी, निगडे, गोडुंब्रे, शिवली, बेबडओहळ व भडवली  प्रत्येकी 1असे  एकूण 56  रुग्ण सापडले.

18979 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7045, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3763 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1115 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 11,923 रुग्ण तर ग्रामीण भागात 9694  रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 87.08 टक्के आहे तर  मृत्यू दर 2 टक्के आहे.  सद्यस्थिती तळेगाव दाभाडे  नगरपरिषद मध्ये 801 लोणावळा नगरपरिषदमध्ये 163 वडगाव नगरपंचायतमध्ये 80 व ग्रामीण भागात 1163 असे एकूण 2207 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.