Chinchwad Crime News : वाकडमधील गुन्हेगार युवराज दाखले दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज – वाकडमधील गुन्हेगार युवराज भगवान दाखले (वय 36, रा. काळेवाडी) याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सोमवारी (दि. 19) दिले आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. युवराज दाखले हा वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात चाकण, शिक्रापूर, भोईवाडा- मुंबई, बार्शी सोलापूर, सांगवी, चिंचवड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

_MPC_DIR_MPU_II

गुन्हेगारी कृत्यांमुळे त्याची परिसरात दहशत निर्माण झाली असल्याने वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार सुहास पाटोळे यांनी त्याच्या सर्व गुन्ह्यांचे रेकॉर्ड जमा केले.

त्याद्वारे तडीपारीची प्रस्ताव तयार करून सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्फत उपायुक्त आनंद भोईटे यांच्याकडे पाठवला. त्यावर शिक्कामोर्तब करत उपायुक्तांनी दाखले याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याचे आदेश दिले असल्याचेही आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.