Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 113 जणांवर कलम 188 नुसार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 113 जणांवर रविवारी (दि. 26) पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पिंपरी चिंचवड शहराला संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर सुरुवातीला मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर दिवसेंदिवस हे गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले. शनिवारी (दि. 25) पोलिसांनी 204 गुन्हे दाखल केले होते.

शुक्रवारी (दि. 24) पिंपरी चिंचवड शहरात प्रशासनाच्या आदेशाचे पालन न केल्याबाबत 298 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर शनिवारी हा आकडा 204 एवढा झाला होता. रविवारी हा आकडा आणखी कमी झाला असून रविवारी 113 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराला संक्रमित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहराला पूर्णपणे सील करण्यात आले आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरू ठेवणाऱ्या, संचारबंदी आदेशाचा भंग करून मोकाट फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (3), भोसरी (6), पिंपरी (5), चिंचवड (3), निगडी (2), आळंदी (2), चाकण (9), म्हाळुंगे चौकी (1), सांगवी (19), वाकड (17), हिंजवडी (23), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (15), रावेत चौकी (2) एकूण 113 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.