Chinchwad : श्री देवर्षी नारद विद्यामंडळ, कीर्तन महाविद्यालयाचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज – नुकत्याच श्री देवर्षि नारद विद्यामंडळाच्या कीर्तन महाविद्यालयाच्या पाठशाळा वर्ग, कीर्तन महाविद्यालय प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष वर्गाचा निकाल नुकताच लागला. पाठशाळा वर्गात शिल्पा धर्माधिकारी यांना प्रथम, कीर्तन परीक्षेत सुवर्णा कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळाले.

पाठशाळा वर्गात शिल्पा धर्माधिकारी यांनी प्रथम क्रमांक मिळाला. अश्विनी इनामदार यांना द्वितीय तर मंजिरी पुरंदरे यांना तृतीय क्रमांक मिळाला. या परीक्षेत एकूण ७ विद्यार्थी बसले होते.

  • कीर्तन महगाविद्यालय वर्गात सुवर्णा कुलकर्णी प्रथम, श्रीराम जोशी द्वितीय, स्नेहल पुरंदरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. कीर्तन महाविद्यालय द्वितीय वर्षात एकूण १८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात कल्याण केसकर यांनी प्रथम, मयुरी घेवारी द्वितीय वंदना कापरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.