Chinchwad : वाल्हेकरवाडीत इलेक्ट्रिक डीपीला आग

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौकातील एका इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी चारच्या सुमारास घडली.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडीमधील चिंतामणी चौकात असलेल्या एका इलेक्ट्रिक डीपीला आज दुपारी चारच्या सुमारास अचानक आग लागली. तसेच या डीपीच्या आगीमुळे आसपासच्या परिसरात असलेल्या भंगारमध्ये आग पसरली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.