Pune : कोरोनामुळे पुण्यातील हि 22 ठिकाणं सील करण्याचा महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव

एमपीसी न्यूज – रात्रंदिवस प्रयत्न करूनही पुणे शहरातील कोरोना काही आटोक्यात यायला तयार नाही. त्यामुळे पुणे महापालिकेने आणखी गंभीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. शहरातील आणखी 22 ठिकाणं सील करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ठेवला आहे.

पत्राचाळ, लेन नंबर 1 ते 48, प्रभाग 20, ताडीवाला रोड, घोरपडी गाव, बालाजीनगर, श्रावस्तीनगर, राजेवाडी क्वार्टर गेट, विकासनगर, वानवडी गाव, लुम्बिनीनगर, ताडीवाला रोड, चिंतामणीनगर, हंडेवाडी रोड, घोरपडी गाव, बी. टी. कवडे रस्ता, लक्ष्मीनगर, जयजवाननगर, येरवडा, पर्वती दर्शन परिसर, जुने शिवाजीनगर बसस्थानक परिसर, पाटील इस्टेट परिसर, भोसलेवाडी, वाकडेवाडी, एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, साईनगर, कोंढवा, विमाननगर, वडगावशेरी, धानोरी, येरवडा, सय्यदनगर, महंमदवाडी हि 22 ठिकाणं सील करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

यापूर्वी मार्केटयार्ड ते पुणे स्टेशन पर्यंतचा परिसर महापालिकेतर्फे सील करण्यात आला होता. तसेच या भागात पोलिसांनी संचारबंदी ही लागू केली होती. त्यामुळे नागरिकांना बाहेर निघणे आणखी कठीण झाले होते. वरील 22 ठिकाणं सील करण्याचा प्रस्ताव दाखल झाल्याने पुणेकरांना आता घरी बसण्याशिवाय पर्याय नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.