PCMC : …तरच कर्ज काढणार; महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – मोशी रुग्णालय, रस्ता सुशोभीकरण(PCMC) यासाठी 550 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यासंदर्भात अजून कोणता निर्णय झालेला नाही. गरज पडली तर कर्ज काढण्यात येईल, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

बाजारात आपली पत काय आहे, हे तपासावे लागते. (PCMC)त्यामुळे महापालिकेने बँकांकडून प्रस्ताव मागवले असल्याचे सांगत आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असून, बचत ठेवी सुरक्षित आहेत. मोठे प्रकल्प महापालिका निधीतून करणे योग्य नाही. छोट्या प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता असते. महापालिकेच्या वतीने शहरात हरित रुग्णालयांची उभारणी करणे आणि महामार्गाचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन सुरू आहे.

Chinchwad : चिंचवडमध्ये 500 कोटींची कामे सुरू, शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
महार्गावर पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भातील नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध बँकांकडून कमी व्याजदराने मुदत कर्ज घेण्यात येणार आहे. सुमारे 12 ते 15 वर्षे कालावधीसाठी कमी व्याजदराने कर्ज मिळविण्यासाठी बँकांना आवाहन केले आहे. कमी दर मिळाल्यास बँक आणि कर्ज घेण्याची निश्चिती करण्यात येणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या न्यूयॉर्क महापालिकेवरही 3 लाख 90 कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे त्यांनी कर्जांमुळे विकास थांबविला नाही. कर्ज मिळणे म्हणजे आपली बाजारात पत आहे, असेही ते म्हणाले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.