Chinchwad : इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना विद्यार्थिनींनी पाठवली कुंचल्यातून साकारलेली भेट

एमपीसी न्यूज – चांद्रयान मोहिमेचे थेट प्रक्षेपण (Chinchwad) पाहून प्रभावीत झालेल्या रहाटणी कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी चंद्रयान मोहिमेवर आधारित चित्रे काढली. त्यातील काही निवडक चित्रे शास्त्रज्ञांविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी इस्रोला पाठवण्यात आली.

पीसीएमसी पब्लिक स्कूल रहाटणी कन्या शाळेतील बहुसंख्य विद्यार्थिनींनी चांद्रयान मोहिमेवर कल्पकतेने चित्रं रेखाटली. अंतराळयान, चंद्रावरील प्रज्ञान , अंतराळात भरारी मारणारे प्रक्षेपक , इस्त्रोसाठी शुभेच्छा अशा अनेक वैविध्यपूर्ण चित्रांचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्व चित्रांचे शाळेत प्रदर्शन आयोजित केले होते.

त्याचा पालक व इतर विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी (Chinchwad) मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शोभा घावटे, साहेबराव धुमाळ ,सुनंदा बोरसे हे उपस्थित होते. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली वेदपाठक व अनिल सुकाळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच शिवाजी फिस्के, ज्ञानदेव गायकवाड, शंकर पवार, उज्वला ढोले, शिल्पाराणी वाडकर, अंजुम शेख, छकुली माळवे, चेतना पाटील यांचा यामध्ये सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.