Chinchwad: संस्कार भारतीने साजरा केला आंतरराष्ट्रीय नृत्यदिन

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडमध्ये संस्कार भारतीच्या वतीने शनिवारी (दि.२०) आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला. यामध्ये सुमारे ८० कलाकारांनी भाग घेतला. 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार भारतीचे माजी मंत्री राष्ट्रीय व राष्ट्रीय रांगोळी विधा प्रमुख चंदुजी घरोटे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड मधील सात नृत्यवर्गांनी या दिनाला एकत्र येऊन आपले आविष्कार सादर केले. एकुण ८० कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला.
  • यामध्ये प्रामुख्याने कथक, भरतनाट्यम व ओडिसी पध्दतीचे नृत्य सादर करण्यात आले. यामध्ये सुवर्णा बाग कलासाधना भरतनाट्यम् अकादमी, वरदा वैशंपायन यांची भरतनाट्यम नृत्योपासना, योगीता व वरदा यांची ओडिसी नाद, स्नेहल सोमण नृत्यशारदा कथक कला मंदिर, सायली काणे कलाश्री नृत्य शाळा, अनुजा वैशंपायन अदिती जोशी नृत्यरंग, स्वप्ना  रत्नाळिकर रुक्मिणी कलाक्षेत्र, .वर्षा अनंतरामन् आणि विद्यार्थिनी या नृत्य संस्थांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा कुलकर्णी, मंच सजावट शरद कुंजीर व सुमीत काटकर, आकर्षक रांगोळी अनिता रोकडे व सहकारी, छायाचित्र विधेचे निखिल देशपांडे या सर्वांचे सहकार्य लाभले. विधा प्रमुख सुवर्णा बाग, मासिक विधा प्रमुख व विभाग प्रमुख वरदा वैशंपायन व स्नेहल सोमण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले‌.

  • पिंपरी चिंचवड संस्कार भारतीचे सचिव हर्षद कुलकर्णी यांनी आभार मानले व जास्तीत जास्त लोकांनी या कलेच्या क्षेत्रात सहभागी व्हावे असे  आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.