Chinchwad : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलात आणखी बदल्या

एमपीसी न्यूज – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील (Chinchwad) सहायक आयुक्त, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

सुरुवातीला शहर पोलीस दलातील सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर दोन टप्प्यात 116 सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आता तिसऱ्या टप्प्यात दोन सहायक आयुक्त तसेच 24 सहायक निरीक्षक आणि 28 पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Rahatani: दारू पिऊन दुचाकी चालवणे बेतले जीवावर, तरुणाचा अपघातात मृत्यू

महासंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आल्या प्रमाणे पोलीस ठाणे हे कार्यकारी पद गृहित धरून, अन्य सर्व शाखा या अकार्यकारी समजण्यात आल्या आहेत. त्यानुसार अकार्यकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पदांवर म्हणजेच पोलीस ठाण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.

देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांची सहायक आयुक्त, प्रशासन (Chinchwad) येथे बदली करण्यात आली आहे. तर घनवट यांच्या जागी प्रशासनचा कार्यभार असलेले सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकडे देहूरोड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.