Rahatani: दारू पिऊन दुचाकी चालवणे बेतले जीवावर, तरुणाचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज –  23 वर्षीय तरुणाला दारू पिऊन दुचाकी चालवणे (Rahatani)चांगलेच महागात पडले आहे. या अपघातात तरुणाला जागीच त्याचा जीव गमवावा लागला.हा अपघात 3 मार्च 2023 रोजी काळेवाडी फाटा पुलावर रहाटणी येथे घडला.
आकाश तानाजी कुंभार  (वय 23 रा.काळेवाडी) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उप निरीक्षक अवधूत शिंगारे यांनी वाकड पोलीस ठाण्यात  सोमवारी (दि.15) फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आरोपी हा दारूच्या नशेत (Rahatani)दुचाकी घेऊन भरधाव वेगात निघाला. त्याचे गाडी वरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. यात तो गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.