Chinchwad News : ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भाईजान सलमान चिंचवडमध्ये, हजारो चाहत्यांची हजेरी

एमपीसी न्यूज – बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने आपल्या आगामी चित्रपट ‘अंतिम’ याच्या प्रमोशनसाठी चिंचवडमध्ये हजेरी लावली होती. चिंचवड येथील एल्प्रो सिटी मॉल मध्ये चित्रपट प्रोमशनासाठी आज (दि.24) अंतिम चित्रपटाची स्टार कास्ट उपस्थित होती. यावेळी आपल्या आवडत्या कलाकाराची एक छलक पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी हजेरी लावली होती.

 

लॉकडाऊननंतर सलमान खान याचा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने, तो सध्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी हजेरी लावत आहे. तसेच, अंतिम चित्रपटाची कथा मुळशीवर आधारित असल्याने पिंपरी चिंचवड मध्ये प्रमोशनसाठी त्याने हजेरी लावत चाहत्यांशी संवाद साधला व चित्रपट पाहण्याची विनंती केली. यावेळी चाहत्यांनी भाईजान सलमान खानचे जल्लोषात स्वागत केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे देखील यावेळी उपस्थित होते.

 

अभिनेते दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या सुपरहिट मराठी चित्रपट मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा ‘अंतिम’ हा हिंदी रिमेक आहे. येत्या शुक्रवारी (दि.26) अंतिम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने सलमान खान आणि चित्रपटाची संपूर्ण टीम चिंचवडमध्ये उपस्थित होती. मराठमोळे सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, आयुष शर्मा, महिमा मकवाना, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. तर, सलमान खान यानेच या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

मराठी चित्रपट मुळशी पॅटर्न सुपरहिट ठरल्यानंतर सलमान खान याने याचा रिमेक करण्याची घोषणा केली होती. अभिनेता आणि सलमान खानच्या बहीणीचा पती आयुष शर्मा याच्यासाठी अंतिम चित्रपट महत्वाचा मानला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.