Chinchwad News : चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये आज बुधवारी आकाश दर्शन

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील सायन्स पार्क येथे आज (बुधवार, दि. 8) रोजी सायं. 6 वा. आकाश दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.अत्याधुनिक दुर्बिणीतून आकाशातील चंद्र, गुरु, शनी आणि शुक्र ग्रहांचे निरक्षण करण्याची संधी खगोल प्रेमी साठी सायन्स पार्क तर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हे सगळे ग्रह एका वेळी पश्चिम क्षितिजावर असल्याने ही दुर्मिळ संधी अवकाश दर्शनासाठी उपलब्ध झाली आहे. दुर्बिणीतून आकाशातील हे ग्रह एका वेळी आकाशात क्वचितच पाहायला मिळतात. शनीच्या कडा दुर्बिणीतून पाहण्यासाठी सर्व खगोल प्रेमींनी आकाश दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.