Kivle News : वेश्या व्यवसाय प्रकरणी लॉजवर छापा; दहा महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – किवळे येथील द्वारका लॉजिंग ऍन्ड बोर्डींगवर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा घातला. यावेळी दहा महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (दि. 6) करण्यात आली.

गवी रंगा कृष्णा गोवडा (वय 38, रा. द्वारका लॉजिंग ऍन्ड बोर्डींग, किवळे-देहूरोड), लॉजचा मॅनेजर रामसुख अयोध्याप्रसाद पटेल (रा. गांवदेवी रोड, बोईसर, मुंबई) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्यासह लॉजचा मालक प्रताप शेट्टी (वय 40, रा. कात्रज, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई बेंगलोर महामार्गावर किवळे-देहूरोड येथील द्वारका लॉजिंग ऍन्ड बोर्डींगमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास या लॉजवर छापा घातला. यावेळी एक परदेशी, सहा इतर राज्यातील आणि तीन महाराष्ट्र राज्यातील अशा एकूण 10 पिडीत महिलांची वेश्‍याव्यवसायातून सुटका केली. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 11 हजार 400 रुपये रोख रक्कम, 14 हजार रुपयांचे दोन मोबाईल, 300 रुपये किमतीचे इतर साहित्य, असा एकुण 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, कर्मचारी विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, भगवंता मुठे, अनिल महाजन, जालिंदर गारे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, राजेश कोकाटे, योगेश तिडके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.