Chinchwad : पोलीस आयुक्त ट्विटरद्वारे साधणार नागरिकांशी संवाद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Chinchwad)येत्या शुक्रवारी (दि. 29 डिसेंबर) नागरिकांशी ट्विटरद्वारे संवाद साधणार आहेत. सायबर आणि वाहतूक या दोन मुद्द्यांवर ते नागरिकांशी लाईव्ह संवाद साधतील.

मे महिन्यात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील (Chinchwad)नागरिकांशी अशाच पद्धतीने ट्विटर द्वारे संवाद साधला होता. त्यामध्ये नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

Pune : विकसकाने नांदेड सिटीमध्ये आजपर्यंत किती कामे केली? माजी नगरसेवकांचे अनेक सवाल

त्यांना पोलीस आयुक्तांनी सविस्तर उत्तरे देखील दिली होती. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी हा संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी चार ते पाच या कालावधीत संवादाचा कार्यक्रम होणार आहे.

#LIVE_WITH_CPPCCITY या हॅशटॅगचा वापर करून थेट आयुक्तांशी संवाद साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. प्रत्येक प्रश्नासाठी स्वतंत्र आयडी असेल. एका तासात शक्य तेवढ्या प्रश्नांना पोलीस आयुक्त उत्तरे देतील. त्यानंतरही उर्वरित राहिलेल्या प्रश्नांना पोलिसांकडून उत्तरे दिली जाणार आहेत.

सायबर गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांची मते जाणून घेतली जातील. तसेच त्यांना वरील विषयाबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी या माध्यमातून पोलिसांकडून प्रयत्न केले जातील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.