Pune : सिलेंडर स्फोट प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : विमान नगर येथील आज (बुधवारी) एका मोकळ्या जागेत (Pune) बेकायदेशीर रित्या साठवलेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणी विमाननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, दीपक देवकर यांच्या मोकळ्या जागेत एका पत्र्याच्या शेडमध्ये गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. त्यापैकी 10 सिलिंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. सिलेंडरचा साठा कोणी केला, याची माहिती घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Chinchwad : पोलीस आयुक्त ट्विटरद्वारे साधणार नागरिकांशी संवाद

सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात गॅसचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यावेळी कोणतीही सुरक्षितता पाळली जात नाही. त्याचेच एक उदाहरण आज (Pune) विमाननगर येथे झालेला हा प्रकार आहे. रहिवासी भागात असे उद्योग सरेआम सुरु आहेत. हि घटना दिवसा घडली. यामुळे लेबर कॅम्पमध्ये मजूर नव्हते. रात्री ही घटना घडली असती तर अनेकांना आपल्या जिव गमवावा लागला असता. सिलेंडर कोणी व का साठवले होते याचा तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.