Pune : अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील संघर्ष वाढणार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी उपमुख्यमंत्री (Pune)आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप शिंदे गटाच्या दहा सदस्यांनी केला आहे. त्यामुळे पुण्यात अजित पवार गट विरुद्ध भाजप- शिंदे गट असा नवा संघर्ष सुरू झाला आहे.

या वादावर पुण्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माध्यमासमोर बोलायला नकार दिला आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार विरोधात संघर्ष करण्याचा इशारा दिल्याचे समजते.

Talegaon : कलापिनीच्या ‘रंगवर्धन’ ह्या प्रायोगिक नाटकांसाठीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे पुनर्जीवन……

चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात भाजपच्या मंडल अधिकाऱ्यांची एक बैठक (Pune)होत आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा नियोजन समितीतील काही सदस्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपली व्यथा मांडत अजित पवार यांची थेट तक्रार केली.

त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला आपण अजित पवार यांच्याशी बोलू. ते हा प्रश्न मार्गी लावतील, असे म्हणाले. पण, त्यानंतरही निधी न मिळाल्यास कोर्टात जाण्याची तयारी ठेवा, अशा थेट सूचना चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना केल्या आहेत.

त्यामुळे आगामी काळात चंद्रकांत पाटील विरुद्ध अजित पवार असा संघर्ष होण्याची चर्चा आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होताच अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांनाच सत्तेचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात आपणच यापुढे विकासकामे करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.