Pune : विकसकाने नांदेड सिटीमध्ये आजपर्यंत किती कामे केली? माजी नगरसेवकांचे अनेक सवाल

एमपीसी न्यूज – विकसकाने नांदेड सिटीमध्ये आजपर्यंत (Pune ) किती कामे केली? त्याच्यावर अद्याप आपण कर लावला नाही, याचा अर्थ काय ? नागरिकांना कर लावण्याच्या आधी व्यावसायिकांना कर लावणे गरजेचे होते, ते कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख पुणे मनपा अजित देशमुख यांनी केले नाही, हे आपल्या खात्याचे मोठे “अर्थपूर्ण” अपयश आहे, असे अनेक सवाल माजी नगरसेवकांनी उपस्थित केले आहे.

नांदेड सिटी बाबत या नगरसेवकांनी माहिती दिली आहे. त्याची खातर जमा करावी आणि जबाबदार अधिकारी यांनी कर का लावला नाही, याची चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली आहे. त्यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविण्यात आले आहे.

एक आयटी टॉवर बारा मजली, एक ॲब्ज जीम आणि स्विमिंग टॅंक, एक मॉल त्यात साडेचारशे दुकाने, दोन शाळा आहेत CBSC व ICMC, दीडशे एकरात बंगलो प्लॉटिंग केले, अडीच हजार स्क्वेअर फुट ते पाच हजार स्क्वेअर फुटचे प्लॉट आहेत. 287 प्लॉटवर बंगले बांधून तयार आहेत. 32 एकरामध्ये गोल्फ क्लब आहे त्यात क्रिकेट पीच (Pune ) स्विमिंग टॅंक लॉंग टेनिस, असे इतर अनेक खेळांची विकसित केलेली मैदान आहेत.

Pune : कोंढणपूर येथील श्री तुकाई देवी यात्रे निमित्त पीएमपीएमएल तर्फे जादा बसचे नियोजन

अकरा एकरात ECO पार्क आहे, प्रत्येक सदनिका धारकाकडून साडेतीन लाख रुपये पर हेड वन टाइम मेंटेनन्स घेतला आहे. त्याच्या व्याजातून येणाऱ्या पैशातून सर्व काही मेंटेनन्स होतोय, शंभर बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभ राहतय आणि चारशे एकर मोकळी जागा यापैकी कशावर आणि किती कर लावला याची माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आम्हाला उपलब्ध करून द्यावी, असंघटित मध्यमवर्गीय सामान्य माणसाला त्रास आणि पैसे वाल्याला मोकळे असे आपल्या खात्याचे धोरण आहे का? आपल्या खात्यामध्ये जे प्रभारी अधिकारी नेमलेत त्यांना त्यांच्या खात्यामध्ये परत पाठवा ते त्यांचे काम नीट करत नाहीत महानगरपालिकेचे शेकडो कोटी रुपयांचा नुकसान करताय आणि सामान्य प्रामाणिक पुणेकरांना त्रास देत आहेत. असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे.

या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव मुख्यमंत्री, प्रधान सचिव उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, नगरविकास विभाग 2, पुणे मनपा आयुक्त यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.