Pune : कोंढणपूर येथील श्री तुकाई देवी यात्रे निमित्त पीएमपीएमएल तर्फे जादा बसचे नियोजन

एमपीसी न्यूज – कोंढणपूर येथील (Pune) श्री तुकाईदेवी यात्रा निमित्त पीएमपीएमएल तर्फे नियमित 5 बसेससह 2 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. या जादा बसेस 29 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आठवड्यातील दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी भाविकांच्या सोयीसाठी धावणार आहेत.

कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर या मार्गावर या बसेस धावणार आहेत. आठवड्यातील दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी 2 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.सध्या कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर या मार्गावर पीएमपीएमएलच्या दररोज नियमित 5 बसेस दर 30 मिनिटांच्या वारंवारीतेने सुरु आहेत. दिवसभरात एकूण 58 फेऱ्या होतात. श्री तुकाईदेवी यात्रे निमित्त गर्दीनुसार व आवश्यकतेनुसार 2 जादा बसेस धावणार आहेत.

Talegaon : तळेगाव मधील श्रीमंत घरावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांच्या जाळ्यात

तसेच पुणे सातारा रोडवर कात्रज सर्पोद्यान बसस्थानका वरून बसमार्ग क्र. 61- कात्रज सर्पोद्यान ते सारोळा (दररोज 5 बसेस), मार्ग क्र. 293- कात्रज सर्पोद्यान ते सासवड – मार्गे कापूरहोळ (दररोज 2 बसेस), मार्ग क्र. 296- कात्रज सर्पोद्यान ते विंझर (दररोज 3 बसेस) व मार्ग क्र. 296 अ- कात्रज सर्पोद्यान ते वांगणीवाडी (दररोज 1 बस) या मार्गावर संचलनात असणाऱ्या बसेस कोंढणपूर फाट्यापर्यंत जाण्यासाठी (Pune) उपलब्ध आहेत.

तरी कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.