Chinchwad : पदचारी नागरिकांचे मोबाईल हिसकावून धूम स्टाईलने पळून जाणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन (Chinchwad) जबरदस्तीने हिसकावून धूम स्टाईलने पळून जाणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाख 38 हजार रुपये किमतीचे सहा महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.

राज उर्फ नन्या आनंद लष्करे (वय 19, रा. रामनगर, पिंपरी), केशव उर्फ ओम किशोर अलंकार (वय 18, रा. दत्तनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीसा उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर चिंचवड येथे एका दुचाकीवरून तिघेजण संशयितपणे फिरत असून त्यांच्याकडे असलेले मोबाईल फोन विक्रीबाबत ते नागरिकांकडे विचारपूस करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार अजित सानप व नामदेव कापसे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन तिघांना ताब्यात घेतले.

Maharashtra : विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

आरोपींनी चिखली, दिघी परिसरातून चोरलेले एक लाख 38 हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. रस्त्याने फोनवर बोलत जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल (Chinchwad) जबरदस्तीने हिसकावून आरोपी धूम स्टाईलने दुचाकीवरून पळून जात.

आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि त्यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.