Maharashtra : विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra) यांना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. न्यायालयाचा 11 मेचा आदेश असतानाही सभापती राहुल नार्वेकर जाणूनबुजून निर्णयास विलंब करत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

Maval : बालविवाह प्रकरणी पतीस अटक

जून 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी केली. आणि शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. आमदार सुनील प्रभू यांनी या विरोधात (Maharashtra) शिंदे आणि इतर 15 आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली होती.

प्रभू यांनी या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अपात्रतेच्या याचिकांची सुनावणी जलद गतीने करण्यासाठी सभापतींना निर्देश द्यावेत. नार्वेकर जाणीवपूर्वक सुनावणीला उशीर करत आहेत, असा दावा त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.