Chinchwad : घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईतांना अटक; अर्धा किलो चांदीसह सात लाखांचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज – घरफोड्या करणाऱ्या दोन (Chinchwad) सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सात लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.

राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर (रा. वाघोली (गौर) ता. कळंब जि. धाराशिव), राहूल उर्फ लल्या हिरामण लष्करे (रा. गौसिया मस्जिदजवळ, काळाखडक झोपडपटी, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी काटे इस्टेट, चोविसावाडी च-होली दीघी परिसरामध्ये अज्ञात चोरटयांनी दिवसा एकाचवेळी सहा ठिकाणी घरे फोडून चोरी केल्याची घटना घडली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन आरोपींची ओळख पटवली. त्यानुसार लातुर, उस्मानाबाद, वाघोली, मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आरोपींचा शोध घेत राहुल लष्करे आणि राम क्षीरसागर या दोघांना वाकड मधून अटक केली.

त्यांच्याकडून पोलिसांनी सात लाख रुपये किमतीचे नऊ तोळे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे, तसेच 450 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, दुचाकी असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील दोन, चिंचवड, लोणीकंद आणि शिरवळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

Bhosari : महावितरणच्या धोकादायक वीज वाहिन्या होणार भूमिगत

आरोपी राहुल लष्करे यांच्यावर देहूरोड गोरेगाव महाड टाउन रत्नागिरी चतुश रुंदी वाकड पोलीस ठाण्यांमध्ये अकरा गंभीर गुन्हे (Chinchwad) दाखल आहेत. तर राम क्षीरसागर याच्यावर चिंचवड हिंजवडी मुंडवा रत्नागिरी आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे राहुल लष्करे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील दोन वर्षांपूर्वी तडीपार देखील केले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, प्रमोद वेताळ, उषा दळे, जयवंत राऊत, देवा राऊत, आशिष कुडके, अजित सानप, शिवाजी मुंडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.