Pimpri: कोरोनाची खबरदारी! नागरिकांना उद्यापासून महापालिकेत प्रवेश बंद; मेल, पत्राद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन

अपवादात्मक स्थितीत वेळ घेऊनच महापालिकेत यावे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. आजाराचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांना 31 मार्चपर्यंत महापालिकेत प्रवेश दिला जाणार नाही.

मेल, पत्राद्वारे संपर्क साधण्यात यावा. अपवादात्मक परिस्थितीत, कामकाजाच्या आवश्यकतेनुसार नागरीकांना मुख्य कार्यालयात येणे आवश्यक असलेल्या वेळ घेऊनच महापालिकेत यावे असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

कोरोनाचे शहरात नऊ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये दैनंदिन व वैयक्तिक कामासाठी नागरिक तसेच अन्य सेवाभावी संस्थाचे समाजसेवक, ठेकेदार, ठेकेदारांचे कर्मचारी यांची मुख्य कार्यालयात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

त्यामुळे विषाणुचा प्रसार टाळण्यासाठी महापालिका कार्यालयात नागरिकांना 31 मार्च 2020 पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. अत्यावश्यक काम असेल. तर, नागरिकांनी महापालिके यावे असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.