Pimpri News : शहरातील शिक्षकांचा 31 तारखेला संवाद दिन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कार्यरत सर्व व्यवस्‍थापनाच्या सर्व माध्यमाच्या खासगी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचा संवाद दिन हा 31 मे 2022 रोजी निगडीतील सिटी प्राईड स्कूल या शाळेत दुपारी 3 वाजता आयोजित केलेला आहे, याबाबतची माहिती शिक्षण विभागाचे प्राथमिक प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी संवाद दिन दुपारी 3 वाजता होणार आहे. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वैयक्तिक तक्रारी असतील त्यांनी शासन निर्णयातील विहित कार्यपद्धतीनुसार 28 मे अखेर [email protected] या ईमेलवर अर्ज पाठवावेत. मे 2022 मधील संवाद दिनासाठी जे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तक्रार अर्ज दाखल करतील, त्यांनी या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.