Bhosari news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले

एमपीसी न्यूज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार व पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या भोसरी येथील घरी भेट देऊन सांत्वन केले.

भाजप आमदार व पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे व उद्योजक कार्तिक लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसन लांडगे( वय 65 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने 24 सप्टेंबर रोजी निधन झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 6 वा चे सुमारास भाजप आमदार व पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी लांडगे कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळेस तेथे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे चिंचवड विधानसभा प्रमुख शंकर जगताप, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.