Nigdi : सीएमएस तर्फे ‘अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे’ लोकार्पण लवकरच !

एमपीसी न्यूज़ – सीएमएस या नावाने प्रसिद्ध असलेल्या चिंचवड मल्याळी समाजाची स्थापना 1966 मध्ये साधारण पद्धतीने करण्यात आली. (Nigdi)  सीएमएस गेल्या 58 वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धर्मादाय  क्षेत्रात काम करत आहे.येथे लवकरच अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचेलोकार्पण केले जाणार आहे.

सीएमएस कलामंदिर परफॉर्मिंग आर्ट्सची अकादमी म्हणजे चिंचवड मल्याळी समाजाचा आणखी एक तुरा आहे, ज्याची स्थापना परफॉर्मिग आर्ट्सच्या क्षेत्रात येणार्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात देण्याच्या प्राथमिक उद्देशाने करण्यात आली आहे.

सीएमएस कलामंदिरचे उद्घाटन पद्मशुरी मत्तनूर शंकरनकुट्टी यांच्या हस्ते होत आहे. “चेंदा वादयम” आणि इतर तालवाद्‌यांचे सुप्रसिद्ध विद्वानअध्यक्ष केरळ संगीत नाटक अकादमी, केरळ भवनात 16 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता.  आमदार अण्णा दादू बनसोडे व माजी नगरसेवक राजू मिसाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होणार आहे.

PCMC : शहरात 2026 पर्यंत 50 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे लक्ष्य – आयुक्त सिंह

यावेळी प्रमुख अतिथी कडून “ओरू थाई नादम नालेककुवेडी” (उद्यासाठी रोपटे लावणे) या थीमनुसार रोप भेट दिली जातील.

ही अकादमी पात्र आणि अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम, मोहिनीअट्टम हिंदुस्थनी  गायन, तबला हार्मोनियम की-बोर्ड, गिटार, कर्नाटकी गायन आणि वाद इत्यादी अभ्यासक्रम शिकवणार आहे. सीएमएस कलामंदिर आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीसाठी योग्य व्यासपीठ देखील देईल.(Nigdi) नजीकच्या भविष्यात एका मोठ्या कॅम्पसमध्ये पूर्ण सुविधा सुरु करण्याच्या अंतिम दृष्टीकोनातून अकादमी सुरु करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कृपया केरळ भवन कार्यालयाचा संपर्क क्रमांक 7774061736 वर संपर्क साधा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.