PCMC : शहरात 2026 पर्यंत 50 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे लक्ष्य – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण तीनचाकी वाहनांपैकी 2026 पर्यंत किमान 50% इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. (PCMC) सर्वांच्या सहकार्याने हे लक्ष्य साध्य करू शकू.  CNG ते इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा हा बदल शक्य तितका सुलभ आणि किफायतशीर करण्यासाठी महापालिका ऑटो-मालकांना पूर्ण पाठिंबा देईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिक व्हेहिकल (EV) सेलने शहरातील इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरच्या वापरला गती देण्याच्या उद्देशाने उद्योग भागधारकांची बैठक आयोजित केली होती.  RMI इंडियाच्या तांत्रिक सहाय्यासह सिटी EV सेलने शहरातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ऑटोरिक्षाच्या तुलनेत इलेक्ट्रिक तीनचाकी ऑटोरिक्षा चालविण्याच्या अर्थशास्त्राचा तपशीलवार माहिती सादर केली.  सध्याच्या ऑटोरिक्षा युनियनना शहरातील इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेले विविध मॉडेल्स, तंत्रज्ञान आणि अर्थकारण इत्यादीची माहिती मिळाली.

पिंपरी-चिंचवड ईव्ही सेलने शहरातील तीनचाकी वाहन विभागात ईव्हीच्या वापरास गती देण्याच्या महामंडळाच्या योजनेबद्दल जागरूकता वाढविण्याचा एक भाग म्हणून शहरातील सर्व प्रमुख उद्योग भागधारकांना आणि वाहन संघटनांना आमंत्रित केले होते. (PCMC)  आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली साठहून अधिक व्यावसायिकांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी महापालिकेच्या पर्यावरण, विद्युत, बांधकाम परवानगी आणि इतर विभागांच्या विभाग प्रमुखांसह सक्रिय सहभाग घेतला.

या बैठकीत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL), महा मेट्रो आणि इतर सरकारी संस्थांचाही सहभाग होता.  तीन-चाकी वाहन श्रेणीतील विद्यमान मूळ उपकरणे उत्पादक (OEM), चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग इन्फ्रास्ट्रक्चर पुरवठादार, बँका आणि वित्तीय संस्था, प्रमुख ऑटो युनियन लीडर्स आणि शहरातील काही ई-ऑटो ड्रायव्हर्स (पुरुष आणि महिला दोन्ही) इ. चा देखील समावेश होता.

Pune : प्रशांत जगताप यांना पार्टीच्या नेतृत्वाने जाब विचारला पाहिजे – पालकमंत्री

सीएनजी ऑटोच्या तुलनेत इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाकडे जाण्याच्या तांत्रिक आणि आर्थिक परिणामांबद्दल ऑटो युनियनला जागरूक करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.  या बैठकीच्या माध्यमातून RMI India च्या वतीने शहरातील रिक्षाचालकांना इलेक्ट्रिक रिक्षांच्या खरेदीसाठी येणारा खर्च आणि चालवण्यासाठी येणारा एकूण खर्च याबाबत माहिती मिळाली. यावेळी पिंपरी चिंचवड शहरात इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा खरेदीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सवलतींची देखील माहिती देण्यात आली.  इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाच्या आर्थिक व्यवहार्यता आणि इलेक्ट्रिक ऑटोकरिता नजीकच्या भविष्यात ही वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधांच्या विकासाबाबतही चर्चा करण्यात आली. शहरामध्ये इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा घेण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांना बँका व फायनांनशीयल संस्थांकडून करण्यात येणा-या वित्तपुरवठ्याबबत माहिती देण्यात आली.

माणदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक आणि अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी शहरातील महिला ऑटो रिक्षा चालकांना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या संस्थेच्या दृष्टिकोनाबाबत माहिती दिली. (PCMC) या बैठकीने शहरातील ईव्ही ऑटोरिक्षांचा वापर वाढवण्यासाठी मदत होईल.  ईव्ही सेलने सीएनजी वाहनांच्या तुलनेत ईव्ही खरेदी अधिक आकर्षक करण्याबाबत भविष्यात काम करण्याचे ठरविले आहे.  EV सेलने इलेक्ट्रिक ऑटो-ड्रायव्हर्सना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच अशाच आणखी एका तपशीलवार बैठक घेण्याची योजना आखली आहे.  याद्वारे पर्यावरणाचा –हास व शहरातील प्रदूषण कमी करण्यावर महानगरपालिकेचा भर आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.