Playgathon Campaigns : प्लेगाॅथोन मोहिमेत 15 किलो प्लास्टिक बाटल्या,प्लास्टिक पिशव्या केल्या संकलित

एमपीसी न्यूज – ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022 व स्वच्छ महाराष्ट्र मिशन ” अंतर्गत लक्ष्मणनगर, गुजरनगर परिसरात स्वच्छता व प्लास्टिक बंदी बाबत संदेश रॅली काढण्यात आली. या प्लेगाॅथोन मोहिमेत (Playgathon Campaigns) 15 किलो प्लास्टिक बाटल्या,प्लास्टिक पिशव्या संकलित केल्या आहेत.

प्रेरणा शाळा, शिवकाॅलनी, शनिमंदिर रोड, लक्ष्मीबाई उद्यानामध्ये प्लास्टिक बाटल्या,प्लास्टिक पिशव्या प्लास्टिकचे साहित्य एकूण 15 किलो गोळा करण्यात आले. या परिसरातील महिला व नागरिकांनी मोहिमेत सहभाग घेतला होता. या भागातील परिसर प्लास्टिक गोळा करुन व स्वच्छता मोहीम राबवून त्या ठिकाणी स्वच्छता संदेश व प्लास्टिक वापरु नका अशी घोषणा देण्यात आली.

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेचा मुहूर्त ठरला?

‘प्लास्टिकचा वापर टाळा पर्यावरणाला वाचवा, प्लास्टिक पिशव्याच्या वापर करु नका आपल्या आरोग्य वाचवा अशी घोषणा दिली तसेच प्लास्टिक पिशव्या वापरु नका कापडीच पिशव्या वापरा अशी नागरिकांना या जनजागृती मोहीम प्लेगाॅथोन मोहीम (Playgathon Campaigns) अंतर्गत त्यांना जनजागृती संदेश देण्यात आलेला आहे.

प्लेगाॅथोन जनजागृती अंतर्गत प्लास्टिक पिशव्या गोळा करुन परिसर साफसफाई करुन स्वच्छतेचा संदेश प्लास्टिक वापरु नका कापडीच पिशव्या वापरा अशा संदेश देऊन जनजागृती रॅलीचा आयोजन करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास उद्यान परिवाराचे 40 जेष्ठ नागरिक आरोग्य निरीक्षक एस.बी. चन्नाल, कर्मचारी अरुण राऊत, अनिल डोंगरे, राजु जगताप, अभय दारोळे, सूर्यकांत चाबुकस्वार असे एकूण 20 महापालिका कर्मचारी, शुभम उद्योगच्या सुपरवायझर सुजता सोनवणे व त्यांचे 30 कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.