Vadgaon Maval News : वडगाव प्राथमिक शाळेत गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर संगीत कक्षाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव मावळ येथे वडगांव मावळ येथील संगीत विशारद स्व.रविंद्र पंडितराव भालेकर यांच्या स्मरणार्थ गानसम्राज्ञी भारतरत्न स्व.लता मंगेशकर संगीत कक्षाची सुरुवात करण्यात आली. या कक्षाचे उदघाटन मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. वडगाव शहर भाजपाचे वतीने नगरसेवक भूषण मुथा यांच्या संकल्पनेतून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

याप्रसंगी श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त श्री सोपानराव म्हाळसकर,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सभापती रेवती वाघवले, डॉ.रविंद्र आचार्य, वडगाव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनंता कुडे, हभप दिलीप खेंगरे, हभप किसन केदारी, यदुनाथ चोरघे, माजी ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब भालेकर,वसंत भिलारे, सोमनाथ काळे, प्रदीप बवरे, सुरेश भंडारी, दीपक बवरे ,माजी उपसभापती व नगरसेवक प्रवीण चव्हाण, नगरसेवक व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रसाद पिंगळे, नगरसेविका सुनिता भिलारे, माजी शहराध्यक्ष किरण भिलारे , मनोज गुजराणी, मोरेश्वर पोफळे, पत्रकार सुदेश गिरमे, शिवाजी होनावळे, शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे, महाराष्ट्र राज्य ग्राहक मंच सचिव अरुण वाघमारे, राजेंद्र पवार, व्याख्याते विवेक गुरव, लायन्स क्लब ऑफ वडगांव चे अध्यक्ष दिलीप मुथा, वडगाव विकास सहकारी सोसायटीचे संचालक गणेश भालेकर, शंकर भोंडवे, बाळासाहेब बोरावके, मधुकर गुरव, अमोल ठोंबरे, संजय जानेराव, अ‍ॅड. अमित मुथा, नितीन गाडे, सुनंदा पवार, कविता भालेकर,
देवेश भालेकर, स्वानंद भालेकर, वितराग मुथा, निखील साने, आदित्य महांगरे, मुख्याध्यापिका सुलोचना साबळे , शिक्षिका राजश्री घोरपडे,जयमाला जाधव, ज्योत्स्ना पटेकर, स्मिता पवार हे शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी तसेच भालेकर कुटूंबातील सर्व सदस्य आदी उपस्थित होते.

Playgathon Campaigns : प्लेगाॅथोन मोहिमेत 15 किलो प्लास्टिक बाटल्या,प्लास्टिक पिशव्या केल्या संकलित

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा व प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असतानाच येथील विद्यार्थी गायन व वादन कलेचे शिक्षण घेऊनच येथून बाहेर पडावा यासाठी हा संगीत कक्ष उभारून संगीत शिक्षकांच्या माध्यमातून उदयोन्मुख बालकलाकारांना घडविण्यासाठी वडगाव शहर भाजपाने हा आगळावेगळा उपक्रम चालू केला आहे असे मत भास्करराव म्हाळसकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, स्व.रविंद्र भालेकर यांच्या कन्या कु.प्रज्ञा भालेकर, व्याख्याते विवेक गुरव, डॉ.रविंद्र आचार्य, हभप दिलीप महाराज खेंगले आदींनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली व स्व.रविंद्र भालेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Coronavirus : चिंताजनक! कोरोनाचा धोका वाढता वाढता वाढे… देशात 13 हजार 216 नवीन कोरोनाबाधित

शाळेत विविध वाद्यांचा एक संच भेट दिला असून यासोबतच संगीत शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. शालेय व्यवस्थापनाच्या वेळेनुसार सदर शिक्षक शाळेत येऊन विद्यार्थ्यांना गायन आणि वादनाचे धडे देतील तसेच या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे संगीत शिक्षण विनामूल्य स्वरूपात उपलब्ध असेल

प्रास्ताविक नगरसेवक भूषण मुथा यांनी केले ज्यामध्ये त्यांनी हा उपक्रम सुरू करण्यामागील संकल्पना विशद केली. सूत्रसंचालन सरचिटणीस कल्पेश भोंडवे यांनी केले. सरचिटणीस मकरंद बवरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.