Shrijit Rameshan : आरटीआय कार्यकर्ते श्रीजीत रमेशन मंगळवारी पोलीस आयुक्तालयासमोर करणार लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – कोणतीही नोंदणी न करता बेकायदेशीरपणे चर्च चालविले जात असून बोगस रबरी शिक्के वापरून ख्रिश्चन विवाह सोहळा पार पाडला जातो. याबाबतचे सर्व पुरावे, कागदपत्रे आणि अनेक स्मरणपत्रे देण्यात आली. तरीही देहूरोड पोलीस दोषींवर एफआयआर दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप करत येत्या मंगळवारी (दि.21) सकाळी 11 वाजता पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तलयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे आरटीआय कार्यकर्ते श्रीजीत रमेशन (Shrijit Rameshan) यांनी सांगितले.

याबाबत सांगताना रमेशन (Shrijit Rameshan) म्हणाले, देहूरोड येथे कोणतीही नोंदणी न करता बेकायदेशीरपणे एक चर्च चालविले जात आहे. विविध बोगस रबरी शिक्के वापरून विवाह सोहळा पार पाडले जातात. बोगस प्राधिकरण प्रमाणपत्राच्या मदतीने नोंदणी महानिरीक्षकांची फसवणूक केली जात आहेत. अधिकाराशिवाय बोगस विवाह प्रमाणपत्र देऊन लोकांची, सरकारी कार्यालयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधीतांविरोधात तक्रार केली आहे.

Vadgaon Maval News : वडगाव प्राथमिक शाळेत गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर संगीत कक्षाचे उद्घाटन

 

Gold Rate Today : सोन्याचे दर ‘जैसे थे’; तर चांदी झाली किंचित स्वस्त, वाचा आजचे दर

पोलिसांना सर्व पुरावे, कागदपत्रे आणि अनेक स्मरणपत्रे देण्यात आली. तरीही देहूरोड पोलीस दोषींवर एफआयआर दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहेत. हे गुन्हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. असे असतानाही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ 21 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर उपोषण करणार आहे. एफआयआर दाखल करण्यास विलंब केल्याबद्दल दोषी पोलिस अधिकार्‍यांच्या विरोधात चौकशीची मागणी गृहमंत्रालयाकडे केल्याचे रमेशन यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.