Chinchwad : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे कोंबिंग ऑपरेशन; रेकॉर्डवरील 20 आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आयुक्तालयाच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन केले. गुन्हे शाखेच्या सर्व युनिट आणि पथकांनी संयुक्तपणे या कारवाईमध्ये सहभाग घेत 92 गुन्हेगार तपासले, त्यामध्ये 20 जणांना पोलिसांनी अटक केली.

शनिवारी (दि. 29) पहाटे एक ते साडेचार या कालावधीत पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची पाच पथके, खंडणी / दरोडा विरोधी पथक, आर्थिक / अंमली पदार्थ विरोधी या पथकांनी सहभाग घेतला. साडेतीन तासात पोलिसांनी 92 गुन्हेगार चेक केले. त्यात पोलिसांना रेकॉर्डवरील 20 गुन्हेगार आढळून आले. या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

सर्व आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 17 गुन्हेगारांना प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी पिंपरी पोलिसांकडे देण्यात आले आहे. तर दोघांना निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला विकास उर्फ बारक्या गायकवाड (वय 19) हा आरोपी सापडला. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी तळेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.