Corona World Update: 69.75 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 26.89 टक्क्यांपर्यंत खाली

कोरोना विषाणूचा आतापर्यंत जगातील अडीच कोटींहून अधिक लोकांना संसर्ग, सुमारे 1 कोटी 77 लाख रुग्णांची कोरोनावर मात, कोरोना बळींनी ओलांडला साडेआठ लाखांचा टप्पा

MPC News (Vivek Inamdar) – कोरोना विषाणूचा आतापर्यंत जगातील अडीच कोटींहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून त्यापैकी सुमारे 1 कोटी 77 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना बळींच्या आकड्याने साडेआठ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण 69.76 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 26.89 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. काल (रविवारी) दिवसभरात सुमारे 2 लाख 20 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी सुमारे 2 लाख 103 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 2 कोटी 53 लाख 83 हजार 993 झाली असून आतापर्यंत एकूण 8 लाख 50 हजार 588 (3.35 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 कोटी 77 लाख 06 हजार 667 (69.76 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 68 लाख 26 हजार 738 (26.89 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 67 लाख 65 हजार 634 (99.10 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 61 हजार 104 (0.90 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

22 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 61 हजार 622, कोरोनामुक्त 1 लाख 99 हजार 744 , मृतांची संख्या 5 हजार 343

23 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 10 हजार 619, कोरोनामुक्त 1 लाख 75 हजार 848 , मृतांची संख्या 4 हजार 270

24 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 13 हजार 609, कोरोनामुक्त 2 लाख 74 हजार 860 , मृतांची संख्या 4 हजार 350

25 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 40 हजार 596, कोरोनामुक्त 2 लाख 42 हजार 032, मृतांची संख्या 5 हजार 856

26 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 72 हजार 489, कोरोनामुक्त 2 लाख 66 हजार 290, मृतांची संख्या 6 हजार 338

27 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 72 हजार 370, कोरोनामुक्त 2 लाख 17 हजार 068, मृतांची संख्या 6 हजार 050

28 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 84 हजार 967, कोरोनामुक्त 2 लाख 04 हजार 030, मृतांची संख्या 5 हजार 710

29 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 57 हजार 746, कोरोनामुक्त 2 लाख 10 हजार 722, मृतांची संख्या 5 हजार 304

30 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 20 हजार 670, कोरोनामुक्त 2 लाख 103, मृतांची संख्या 4 हजार 182

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

 

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.