Corona World Update: कोरोना बळींंनी ओलांडला 12 लाखांचा टप्पा, मात्र मृत्यूदर 2.59 टक्क्यांपर्यंत खाली

जगातील 72.18 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 25.23 टक्के

एमपीसी न्यूज –  जगभरात काल (शनिवारी) 4 लाख 75 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे गेले काही दिवस सातत्याने सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढताना पहायला मिळत होते. त्यात काल एक लाखने घट झाली आहे. तसेच गंभीर अथवा चिंताजनक रुग्णांचे प्रमाण 0.72 टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. दरम्यान,  जगातील कोरोना बळींच्या आकड्याने काल 12 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

जगातील कोरोनाचा मृत्यूदर सातत्याने थोडा-थोडा कमी होत 2.59 टक्क्यांपर्यंत खाली आला असला तरी नवीन कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण मात्र आता थोडे घसरताना तर सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण थोडे वाढताना दिसत आहे. सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढून 25.23 टक्के झाले आहे.

वाचा एमपीसी न्यूज – अंतरंगचा दसरा विशेषांक

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 63 लाख 94 हजार 012 झाली असून आतापर्यंत एकूण 12 लाख 397 (2.59 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 87 हजार 667 (72.18 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 1 कोटी 17 लाख 05 हजार 948 (25.23 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1 कोटी 16 लाख 21 हजार 693 (99.28 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 84 हजार 255 (0.72 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

25 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 23 हजार 715, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 36 हजार 197,  मृत्यू 4 हजार 609

26 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 11 हजार 372, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 76 हजार 499,  मृत्यू 5 हजार 110

27 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 59 हजार 020, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 69 हजार 574,  मृत्यू 7 हजार 028

28 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 5लाख 04 हजार 419, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 76 हजार 406,  मृत्यू 7 हजार 104

29 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 5 लाख 45 हजार 903, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 66 हजार 003,  मृत्यू 7 हजार 172

30 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 5 लाख 73 हजार 614, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 57 हजार 335,  मृत्यू 7 हजार 512

31 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 75 हजार 201, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 35 हजार 830,  मृत्यू 6 हजार 488


कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली
आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.