Vadgaon Maval : मावळ तालुक्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 13 मतदार केंद्रांची निर्मिती

एमपीसी न्यूज : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मावळ तालुक्यात 4 हजार 609 पदवीधर तर शिक्षक मतदारसंघासाठी 1 हजार 347  शिक्षक मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मावळ तालुक्यातून एकूण 5 हजार 956 मतदार निवडणुकी सहभागी होणार आहेत. यासाठी 13 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाच जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे पदवीधर व पुणे शिक्षक या दोन मतदार संघासाठी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने मावळ तालुक्यात मतदान प्रक्रियेची तयारी सुरू असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी वडगाव मावळ येथील महिला सांस्कृतिक भवन येथे एक, तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेमध्ये तीन, लोणावळा येथील नगरपरिषदेच्या शाळेमध्ये दोन, कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयात एक व काले येथील जिल्हा परिषद शाळेत एक अशी 8 मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली आहेत.

शिक्षक मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी वडगाव मावळ येथील महिला सांस्कृतिक भवन, तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा, लोणावळा येथील नगरपरिषद शाळा, कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालय व काले येथील जिल्हा परिषद शाळा या 5 ठिकाणी पाच मतदान केंद्रे नियुक्त करण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.