Crime News : रॅपिडो चालकाला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

एमपीसी न्यूज – या परिसरात धंदा करायचा नाही म्हणत रॅपीडो (ओला-उबर) दुचाकी चालकाला मारहाण करणाऱ्यापैकी रिक्षा चालकापैकी एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.हि घटना गुरुवारी (दि.28) रात्री साडे आठच्या सुमारास घडली.

रवी महेश जगताप (वय 22 रा. थेरगाव गावठाण) असे अटक आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी जनार्दन जालींदर कसबे (वय.39 रा.चिंचवड) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Rotary Club : दुर्गम भागातील गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रॅपीडो (ओला-उबर) चालक असून ते गुरुवारी त्यांची रॅपीडो (ओला-उबर) दुचाकी घेऊन पिंपळे सौदागर येथील बिल्डिंगजवळ थांबले होते. यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना तू धंदा का करतोस म्हणत शिवीगाळ करत हाताने मारहाण केली व त्यांच्याजवळील 6 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.