Rotary Club : दुर्गम भागातील गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज –  महागाव मधील सर्व वाड्या-वस्त्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण 55 अति गरजू विद्यार्थ्यांसाठी इमॅजिन रोटरी अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीट (Rotary Club) व रोटरी कम्युनिटी कॉर्पस महागाव यांच्यामार्फत शालेय साहित्याचे वाटप रोटरीचे डिस्ट्रिक्ट साक्षरता संचालक मंगेश हांडे व अध्यक्ष राम भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

कामशेत पासून सुमारे 15 किलोमीटरवर महागाव आहे. ग्रुप ग्रामपंचायत महागाव अंतर्गत यात 6 ते सात वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. त्या महागाव, सावंतवाडी, प्रभाचीवाडी, निकमवाडी, धालेवाडी, मालेवाडी आहेत. महागाव हे गाव अति दुर्गम तसेच डोंगराळ भागात असल्याने येथील मुलांना शाळेत जाण्यासाठी बऱ्याच अंतरावरून पायपीट करावी लागते. तसेच महागाव येथील प्रत्येक शाळेमध्ये गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. हेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीटच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन येथील विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक शालेय किट उपलब्ध करून दिले.

शालेय किटमध्ये स्कूल बॅग, 10 वह्या, कंपास बॉक्स, पाण्यासाठी बॉटल व टिफिन बॉक्सचा समावेश आहे. शालेय कीट स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा गगनात मावेनासा झाला होता.

Dr. Anil Roy : ‘स्टेथोस्कोप’ घेऊन महापालिकेत आलो अन् झाडू घेऊन सेवानिवृत्त झालो तरीही…

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब पिंपरी एलीटचे अध्यक्ष राम भोसले, युवा आणि साक्षरता संचालिका मिता ठाकुर तसेच संगीता भोसले, रवीन्द्र भावे, रश्मी भावे, स्मिता होळ, सुवर्णा काळे, दिनेश पाटिल व रोटरी कम्युनिटी कॉर्पस महागावचे अध्यक्ष दत्ता तिकोणे, सेक्रेटरी देविदास जाधव, डायरेक्टर ॲडमिन ज्ञानेश्वर कंधारे, डायरेक्टर मेंबरशीप लक्ष्मण मरगळे तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते श्री भगवान सावंत, पै. उद्धव जाधव व महागाव पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ बहुसंख्येने (Rotary Club) उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट व रोटरी कम्युनिटी कॉर्पस महागावचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून पुढील कार्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.