Cyber Crime : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राज्यात 475 विविध गुन्हे दाखल, 256 अटकेत

475 misdemeanors registered in the state for making offensive posts on social media, 256 arrested

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने राज्यभरात 475 विविध गुन्हे दाखल केले असून 256 व्यक्तींना अटक केल्याचे माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.

राज्यात कालपर्यंत विविध पोलीस ठाण्यात एकूण 475 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यातील 256 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तसेच सोशल मीडियावरील 107 आक्षेपार्ह पोस्ट्स हटविण्यात सायबर विभागाला यश आले आहे.

# कोणत्या माध्यमातून किती गुन्ह्यांची नोंद

व्हॉट्सॲप- 195 गुन्हे

फेसबुक पोस्ट्स – 194 गुन्हे दाखल

टिकटॉक व्हिडिओ- 24 गुन्हे दाखल

ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 8 गुन्हे दाखल

इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- 4 गुन्हे

अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – 50 गुन्हे दाखल

पुणे ग्रामीण हद्दीत एका नवीन गुन्ह्याची नोंद झाली असून पुणे विभागात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 41 वर पोहोचली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून या आरोपींनी स्वतःच्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीबाबत सरकार ज्या उपाययोजना करत आहेत त्यावर टिपणी करत त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत अक्षेपार्ह मजकूर असणारी पोस्ट शेअर केली होती.

लाॅकडाऊनच्या काळात सायबर चोरटे विविध क्लुप्त्या व साधनांचा वापर करून ऑनलाइन चोरी करू शकतात.

त्यामुळे सर्वच नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही ऑनलाइन माहिती कोणालाही शेअर न करण्याचे आवाहन सायबर सेलने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.