Pimpri: गुड न्यूज ! एकाच दिवशी 73 जणांना डिस्चार्ज; 43 नवीन रुग्णांची भर

Good news! Discharged 73 people on the same day; Addition of 43 new patients

दापोडीतील महिलेचा YCMHमध्ये मृत्यू, एकूण रुग्णसंख्या पोहोचली 1148 वर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 73 जणांना आज (शनिवारी) डिस्चार्ज देण्यात आला. तर, शहराच्या विविध भागातील 38 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दापोडीतील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 1148 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील नाणेकर चाळ, बौध्दनगर, रमाबाईनगर- पिंपरी, दापोडी, आनंदनगर- चिंचवड, गवळीनगर -भोसरी, नेहरुनगर, अजंठानगर, जुनी सांगवी, गुलाबनगर -दापोडी, साईबाबानगर- चिंचवड, बिजलीनगर, वैभवनगर- पिंपरी, तापकीरनगर -काळेवाडी, नढेनगर-काळेवाडी, नवी सांगवी परिसरातील 38 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 21 पुरुष आणि 17 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय पुण्यातील सिंहगड रोड आणि खडकीतील तीन पुरुष व दोन महिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दिवसभरात एकूण 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, आनंदनगर, मोरेवस्ती, रामनगर- चिंचवड, ताथवडे, नाणेकर चाळ -पिंपरी, महात्मा फुलेनगर -वायसीएम, आनंदनगर -जुनी सांगवी, लिंक रोड -पिंपरी, गुलाबनगर -दापोडी, जनतानगर -चिंचवड, बौध्दनगर- पिंपरी, दत्तनगर- वाकड, अजंठानगर, मोरवाडी, पाटिलनगर-चिखली, ढोरेनगर- सांगवी, निगडी, पिंपळे गुरव, सदगुरु कॉलनी वाकड, लिंबोरे वस्ती -दापोडी, चिंचवड स्टेशन, शिंदेनगर- जुनी सांगवी, इंदिरानगर- चिंचवड, रुपीनगर, खेड, जुन्नर, बोपोडी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या व कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 73 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 1148 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 617 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 19 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 19 अशा 38 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 494 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 1275

# पॉझिटीव्ह रुग्ण – 43

#निगेटीव्ह रुग्ण – 1102

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 293

#रुग्णालयात दाखल एकूण रुग्ण संख्या – 906

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 1113

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1148

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 494

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 38

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 617

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 24078

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 75084

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.