Pimpri News : वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

एमपीसी न्यूज : वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती सुरु केली आहे. (Pimpri News) अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.

सध्या ऑनलाईनचा जमाना असल्याने जास्तीतजास्त आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे गुन्हेगार देखील लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हें दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.

याविषयी बोलताना, शिंदे म्हणाले की, “पूर्वी घरफोड्या, पाकीटमारणे व इतर प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत होते. घरफोडी करणे जोखमीचे आहे. पण सायबर गुन्ह्यात अशी काही रिस्क नसते. चोर त्याच्या ठिकाणी बसून कुणाचीही आर्थिक फसवणूक करू शकतो. यामुळे सायबर गुन्हे वाढले आहेत.”

सायबर गुन्हे रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी छोट्या छोट्या खबरदाऱ्या घेतल्या तर त्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही. त्यामुळे लोकांमध्ये या संदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये मोबाईल फोन व इंटरनेटचा वापर वाढत आहे. त्यामुळे त्यांची ऑनलाईन फसवणूक होऊ शकते (Pimpri News)त्यासाठी शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. पोलिसांमार्फत आम्ही काही मुलांना ट्रेन करू. त्यांना आम्ही पेन ड्राईव्ह मध्ये पीपीटी प्रेजन्टेशन देऊ. ज्यामध्ये सायबर गुन्हे रोखण्यासंदर्भात माहिती असेल. ते नंतर त्यांच्या शाळा व कॉलेज मध्ये इतर विद्यार्थ्यांना ही माहिती सांगतील व जनजागृती निर्माण करतील, असे शिंदे म्हणाले.

Talegaon Dabhade : जिल्हास्तरीय मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश परदेशी, श्रुती वेळेकर प्रथम

प्रत्येक बुधवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे रोखण्यासाठीचे मार्गदर्शन कार्यक्रम निगडी येथील मुख्यालयात घेण्यात येत आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना, संजय तुंगार, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय म्हणाले की, पोलिसांच्या वतीने शाळा व कॉलेजेस मध्ये 1 ते 1.5 तासांचे सायबर गुन्हे रोखण्या संदर्भातील मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जात आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना सांगितले जाते की,(Pimpri News) अनोळखी ऍप इंस्टॉल करू नका, अनोळखी माणसाने लिंक पाठविल्यास ती लिंक ओपन करू नका, अनोळखी व्यक्तींकडून आलेला क्यू आर कोड स्कॅन करू नका, ओटीपी अनोळखी व्यक्तीं सोबत शेअर करू नका व कोणत्याही अनोळखी व्यक्तीने कुठेही पैसे गुंतवणूक करण्यासाठी सांगितले तर ते करू नका, असे सांगितले आहे.”

तुंगार पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना सांगितले जाते की सोशल मीडियावर द्वेष करणारे, देवी देवतांचे अपमान करणारे मेसेजेस पोस्ट करू नका. (Pimpri News) अशा प्रकारचे बेसिक डूज अँड डोन्ट्स यांची त्यांना माहिती दिली जाते. जर तुमची कुणी बदनामी करत असेल, तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल किंवा सेक्सटॉर्शन करत असेल तर घाबरू नका. तुम्ही याबाबत पोलिसांकडे तक्रार करा व पोलिसांची मदत घ्या, असा सल्ला दिला जातो. कार्यक्रमाच्या शेवटी थोडावेळ प्रश्नोत्तरे होतात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले जाते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.